VIDEO: देसी जुगाड! दुचाकीवरून प्रवास करताना लहान मुलाला बसवले दुधाच्या डब्यात; सोशल मिडियावर व्हिडिओ व्हायरल

हे मुल लहान असल्याने त्याला एकट्याने दुचाकीवरून घेऊन जाणे अवघड असल्याचे लक्षात आल्यानंतर, त्याच्या वडिलांनी त्याला चक्क गाडीला बांधलेल्या दुधाच्या डब्यात बसवले.

देसी जुगाड

आपल्या देशात जुगाड करणाऱ्या लोकांची कमतरता नाही. जेव्हा-जेव्हा शक्य असेल तेव्हा भारतीय विविध प्रकारचे जुगाड करून आपले काम पूर्ण करतात. अशा जुगाडांशी संबंधित विविध प्रकारचे मजेदार व्हिडिओ सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होतात. आजकाल असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हीही तुमचे हसू आवरू शकणार नाही. या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक व्यक्ती आपल्या लहान मुलाला दुधाच्या डब्यात बसून दुचाकीवरून जात आहे. या देसी जुगाडचा व्हिडिओ अभिनेता रितेश देशमुखने त्याच्या ट्विटरवर शेअर केला आहे.

हे मुल लहान असल्याने त्याला एकट्याने दुचाकीवरून घेऊन जाणे अवघड असल्याचे लक्षात आल्यानंतर, त्याच्या वडिलांनी त्याला चक्क गाडीला बांधलेल्या दुधाच्या डब्यात बसवले. हे मुलदेखील या प्रवासाचा आनंद घेताना दिसत आहे. (हेही वाचा: Pre-Wedding Photoshoot at Police Station: पोलीस जोडप्याने फिल्मी अंदाजामध्ये स्टेशनमध्ये केले प्री-वेडिंग फोटोशूट; व्हिडिओ व्हायरल)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)