Video: श्री अनंत पद्मनाभ स्वामी मंदिराच्या तलावात राहणाऱ्या ‘शाकाहारी’ मगरीचे निधन, मंदिराच्या आवारातच राहत होती बाबिया, पाहा व्हिडीओ
मगर म्हंटल तर माणसाला फाडून खाणार असा शिकारी आहे. वर्दळीच्या ठिकाणी मगर दिसणे म्हणजे आणखी थरारक अनुभव आहे. दरम्यान, केरळ येथे एक मगर चक्क माणसांसोबत राहत असे आणि फक्त भात खाते, वाचून आश्चर्य वाटत असेल तरी अशी दुर्मिळ शाकाहारी मगर आता आपल्यात नाही. एका दुर्दैवी घटनेत, केरळमधील प्रसिद्ध 'शाकाहारी मगर' बाबियाचे काही दिवसांपूर्वी निधन झाले आहे.
Video: मगर म्हंटल तर माणसाला फाडून खाणार असा शिकारी आहे. वर्दळीच्या ठिकाणी मगर दिसणे म्हणजे आणखी थरारक अनुभव आहे. दरम्यान, केरळ येथे एक मगर चक्क माणसांसोबत राहत असे आणि फक्त भात खाते, वाचून आश्चर्य वाटत असेल तरी अशी दुर्मिळ शाकाहारी मगर आता आपल्यात नाही. एका दुर्दैवी घटनेत, केरळमधील प्रसिद्ध 'शाकाहारी मगर' बाबियाचे काही दिवसांपूर्वी निधन झाले आहे. केरळ येथील अनंतपुरा गावात तलावाच्या मध्यभागी श्री अनंतपुरा मंदिर आहे. पद्मनाभस्वामी मंदिर तिरुवनंतपुरमचे मूळ स्थान असल्याचे मानले जाते. दरम्यान, भक्तांची लाडकी बाबिया मंदिराच्या आवारातच राहत असे. रिपोर्ट्सनुसार, बाबिया कासरगोड येथील श्री आनंदपद्मनाभ स्वामी मंदिराच्या टाकीत राहत होती आणि दिवसातून दोनदा फक्त मंदिराचा प्रसाद खात असे. मादी मगरीला अनेक वर्षांपासून पुजले जात होते. भक्तांचा असा विश्वास होता की बाबिया मगर मंदिराच्या रक्षणासाठी देवाने नियुक्त केलेली होती. बाबियाचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.
पाहा फोटो आणि व्हिडीओ:
‘शाकाहारी’ मगरीचा मृत्यू
‘शाकाहारी’ मगरीचे निधन
‘शाकाहारी’ मगरीचे निधन
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)