Uttarkashi Tunnel Collapse Rescue: उत्तरकाशी येथील बोगद्यात अडकलेल्या मजूरांची कशी होणार सुटका? (Watch Video)
उत्तरकाशी येथील बोगद्यात अडलेल्या मजूरांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. ही मोहीम कसी असेल त्याचे एक प्रात्यक्षीकही बचाव पथकाने करुन पाहिले आहे. ज्याचा व्हिडिओही प्रसारीत करण्यात आला आहे. आपणही येथे हा व्हिडिओ पाहू शकता.
उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी येथील सिल्कियारा बोगदा कोसळल्याने आत अडकलेल्या मजूरांची सुटका करण्यासाठी राबविण्यात येणारी मोहिम अंतिम टप्प्यात आहे. मदत आणि बचाव कार्याचा आज (24 नोव्हेंबर) 13 वा दिवस आहे. बोगदा कोसळल्याने जवळपास 41 मजूर आत अडकले आहेत. मजूरांपर्यंत पोहोचण्यात NDRF पथकाला यश आले आहे. मजूरांशी संपर्क झाला असून त्यांना जीवनावश्यक वस्तू आणि औषधांचा पुरवठा केला जात आहे. दरम्यान, आता प्रतिक्षा आहे केवळ मजूर बोगद्यातून बाहेर येण्याची. एन्डोस्कोपिक फ्लेक्सी कॅमेर्याने अडकलेल्या कामगारांचे दृश्य टीपल्यावर आता त्या मजूरांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. ही मोहीम कसी असेल त्याचे एक प्रात्यक्षीकही बचाव पथकाने करुन पाहिले आहे. ज्याचा व्हिडिओही प्रसारीत करण्यात आला आहे. आपणही येथे हा व्हिडिओ पाहू शकता.
व्हिडिओ
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)