Uttar Pradesh: बाराबंकी रेल्वे क्रॉसिंगवर मद्यधुंद व्यक्तीकडून ट्रेन थांबवण्याचा प्रयत्न, लोको पायलट संतापला (Watch Video)

बाराबंकी रेल्वे क्रॉसिंगवर एक मद्यधुंद व्यक्ती समोरून येणाऱ्या ट्रेनला थांबवण्याचा प्रयत्न करताना कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

Photo Credit- X

Uttar Pradesh: उत्तर प्रदेशमधील बाराबंकी (Barabanki) एक विचित्र घटना घडली. बाराबंकी रेल्वे क्रॉसिंगवर (Railway Crossing) एक मद्यधुंद व्यक्ती समोरून येणाऱ्या ट्रेनला थांबवण्याचा प्रयत्न करताना कॅमेऱ्यात कैद झाली. 3 डिसेंबर रोजी व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये (Viral Video) तो माणूस रुळांवर उभा आहे. त्याचवेळी तेथून ट्रेन पास होत असते. मद्यधूंद इसमाला पाहून लोको पायलट रेल्वेचा स्पीड कमी करतो. इसम मुद्दाम ट्रेन थांबवण्याचा प्रयत्न करत आहे. हे कळल्यावर तो माणूस पटकन बाजूला सरकला. लोको पायलटने त्याला फटकारले. हा व्हिडिओ बडी लाइन बाराबंकी क्रॉसिंगवर चित्रित करण्यात आल्याचे सांगण्यात येत असून अधिकारी या घटनेची चौकशी करत आहेत.

बाराबंकी रेल्वे क्रॉसिंगवर मद्यधुंद व्यक्तीकडून ट्रेन थांबवण्याचा प्रयत्न

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now