UP Bride Called Off Wedding: मुलाला दोनचा पाढा येत नसल्याने मुलीने मांडवातच लग्न मोडले; उत्तर प्रदेशमधील घटना

सोशल मीडियावर एक प्रकरण समोर आले आहे, ज्यात वर अशिक्षित असल्याने एका वधूने लग्नाला नकार दिला आहे. उत्तर प्रदेशातील महोबा जिल्ह्यातील ही घटना आहे.

Marriage | Representational Image (Photo Credits: Pixabay)

UP Bride Called Off Wedding: लहानपणापासूनच मुलांना पाढे शिकवले जातात. कधी कधी तर मुले शाळेत जाण्याआधीच पालक त्यांना पाढे शिकवतात. परंतु काही मुले अशी असतात की, कितीही प्रयत्न केला तरी त्यांना पाढे लक्षात राहत नाहीत. आता याच पाढ्यांमुळे एका मुलीने स्वतःचे लग्न मोडले आहे. सोशल मीडियावर एक प्रकरण समोर आले आहे, ज्यात वर अशिक्षित असल्याने एका वधूने लग्नाला नकार दिला आहे. उत्तर प्रदेशातील महोबा जिल्ह्यातील ही घटना आहे. अहवालानुसार वर अशिक्षित होता, परंतु त्याच्या कुटुंबीयांनी ही वस्तुस्थिती लपविली. लग्नाच्या दिवशी जेव्हा वरात आली तेव्हा वधूला संशय आला की वर अशिक्षित आहे. त्यानंतर तिने वराला दोनचा पाढा म्हणण्यास सांगितले, परंतु वराला तो आला नाही. त्यानंतर वधूने लग्न करण्यास नकार दिला. मे 2021 चे हे प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे आणि लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. (हेही वाचा: Delhi Vada Pav Girl Video: दिल्लीतील व्हायरल वडा पाव गर्लवर हल्ला; पहा व्हिडिओ)

पहा पोस्ट-

 

View this post on Instagram

 

A post shared by शायर योगी 🍁 (@shayar_yogi_)

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement