केंद्रीय मंत्री Dr Bhagwat Karad प्रोटोकॉल बाजूला ठेवत भोवळ येऊन पडलेल्या कॅमेरामॅनच्या मदतीला गेले धावून; सोशल मीडीयात पुन्हा कौतुक (Watch Video)
दिल्लीत एका कार्यक्रमादरम्यान भागवत कराड यांनी चक्कर येऊन पडलेल्या कॅमेरामॅनला वैद्यकीय मदत दिल्याचा व्हिडिओ वायरल होत आहे.
दिल्लीत केंद्रीय मंत्री Dr Bhagwat Karad यांच्या मुलाखती दरम्यान त्यांनी पद, मान बाजूला ठेवत भोवळ येऊन पडलेल्या एका कॅमेरामॅनला मदत केल्याचा व्हिडिओ वायरल होत आहे. विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज कराडांचा व्हीडिओ शेअर करत म्हणूनच डॉक्टरांना देवदूत म्हणतात असं त्यांनी म्हटलं आहे. काही महिन्यांपूर्वी विमानप्रवासादरम्यानही त्यांनी अशीच एका प्रवाशाला मदत केली होती.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)