Two Women Fight in Plane: उडत्या विमानात दोन महिलांमध्ये तुफान हाणामारी; पायलटला करावे लागले इमर्जन्सी लँडिंग, व्हिडिओ व्हायरल (Watch)

त्यापैकी एका महिलेने पुरुष प्रवाशाच्या डोक्यावर मारल्याचा आरोप आहे.

Two Women Fight in Plane

फिलाडेल्फियाहून लास वेगासला जाणाऱ्या फ्रंटियर एअरलाइन्सच्या फ्लाइटमध्ये दोन प्रवाशी महिलांमध्ये मोठे भांडण झाल्याची घटना समोर आली आहे. यानंतर विमानाला डेन्व्हरमध्ये आपत्कालीन लँडिंग करण्यास भाग पाडले. एका जागेवरून दोन महिलांमध्ये वाद सुरू झाला, त्यानंतर या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. हा वाद इतका वाढला की महिलांनी एकमेकांना शिवीगाळ करत धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

यावेळी एका फ्लाइट अटेंडंटने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, परंतु महिला भांडतच राहिल्या. त्यापैकी एका महिलेने पुरुष प्रवाशाच्या डोक्यावर मारल्याचा आरोप आहे. यानंतर फ्लाइट अटेंडंटने वैमानिकाला इमर्जन्सी लँडिंग करण्यास सांगितले आणि विमान डेन्व्हरकडे वळवण्यात आले. विमान डेन्व्हरला वळवण्याआधी सुमारे 15 मिनिटे महिलांमध्ये हे भांडण सुरु राहिले. (हेही वाचा: गोरखपूर विद्यापीठात एबीव्हीपी कार्यकर्त्यांचा गोंधळ; कुलगुरूंना पाठलाग करून मारहाण, व्हिडिओ व्हायरल)

उडत्या विमानात दोन महिलांमध्ये भांडण- 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



संबंधित बातम्या