Tiranga Bandhan: रक्षाबंधन आणि स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभुमीवर संस्कृती मंत्रालयाने जारी केला 'तिरंगा बंधना'चा हृदयस्पर्शी व्हिडिओ (Watch)

रक्षाबंधन आणि स्वातंत्र्य दिनाच्या आधी, भारताच्या सांस्कृतिक मंत्रालयाने 'तिरंगा बंधन' या विचारसरणीचा प्रचार करण्यासाठी सोशल प्लॅटफॉर्मवर एक नवीन व्हिडिओ लॉन्च केला आहे.

Tiranga Bandhan (संग्रहित संपादित प्रतिमा)

यंदा भारत आपल्या स्वातंत्र्याचा 75 वा वर्धापन दिन साजरा करत आहे. हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्याच्या तयारीत देश गुंतला आहे. या पार्श्वभुमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व लोकांना ‘हर घर तिरंगा’ मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. हा राष्ट्रीय स्तरावर साजऱ्या होणाऱ्या आझादी का अमृत महोत्सवाचा एक भाग आहे. लोकांना घरोघरी तिरंगा फडकवण्यासाठी प्रवृत्त करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. त्यात 11 ऑगस्टला देशात रक्षाबंधनचा सण साजरा होणार आहे. अशात सरकारने रक्षाबंधन दिवशी ‘तिरंगा बंधन’ साजरा करण्याचे आवाहन केले आहे.

रक्षाबंधन आणि स्वातंत्र्य दिनाच्या आधी, भारताच्या सांस्कृतिक मंत्रालयाने 'तिरंगा बंधन' या विचारसरणीचा प्रचार करण्यासाठी सोशल प्लॅटफॉर्मवर एक नवीन व्हिडिओ लॉन्च केला आहे. ही जाहिरात भाऊ-बहिणीचे नाते दर्शवते, जिथे मुलगी आपल्या भावाला तसेच भारतीय ध्वजाला राखी बांधते. भारतीय ध्वजाला राखी बांधून देशप्रेमाची भावना वाढीस लागावी, आपल्या भारतीय जवानांचे स्मरण व्हावे, ही या व्हिडीओमागील संकल्पना आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement