Viral Video: काय सांगता, गायीने खेळला चक्क मुलांसोबत फुटबॉल; व्हायरल व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणालं कमाल आहे, Watch

प्रयत्न केल्यावर शेवटी एक मुलगा गायीकडून फुटबॉल घेण्यास यशस्वी होतो. यानंतरही गाय फुटबॉलसाठी त्याच्या मागे धावताना दिसत आहे.

Cow Played Football (PC_ Twitter/@mamatarsingh)

Viral Video: सध्या जगाला फिफा विश्वचषक 2022 चे वेड लागले आहे. लोकांमध्ये फुटबॉलची क्रेझ वाढू लागली आहे. लोकांचं ठीक आहे पण गाय फुटबॉल खेळताना दिसली तर..होय, फुटबॉल खेळत असलेल्या गायीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये मुलं पावसात मैदानात खेळत असताना त्यांचा फुटबॉल गायीजवळ गेला. या व्हिडीओमध्ये गायीने फुटबॉलला कोणीही घेऊ शकणार नाही अशा पद्धतीने जवळ ठेवले. मुले त्यांचा फुटबॉल घेण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रयत्न केल्यावर शेवटी एक मुलगा गायीकडून फुटबॉल घेण्यास यशस्वी होतो. यानंतरही गाय फुटबॉलसाठी त्याच्या मागे धावताना दिसत आहे. या दरम्यान गाय आपल्या डोक्याने आणि पायांनी फुटबॉलला लाथ मारते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. (हेही वाचा - Viral Video: सिंहिणीला मीठीत घेऊन रस्त्यावर धावली महिला; व्हायरल व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल अवाक)

फुटबॉल खेळणाऱ्या गायीचा व्हिडिओ पहा -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)