Viral Video: खोदा पहाड निकला चोर! अग्निशामक दलाने वाचवला चोराचा जीव, सोशल मिडियावर व्हिडिओची चर्चा
अग्निशामक दलाने एका चोराचा जीव वाचवल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
शहराच्या मध्य वसतीत अज्ञाताकडून एक बोगदा तयार करण्यात आला आणि अचानक तो बोगदा कोसळ्यानं परिसरात खळबळ उडाली. संबंधीत घटना बघता नागरिकांनी अग्निशामक दलास (Fire Brigade) संपर्क साधत झालेल्या प्रकाराची माहिती दिली. काहीच वेळात अग्निशामक दल घटना स्थळी दाखल झाला असता त्या बोगद्यातून एका इसमास वाचवण्यास यश आलं. बोगद्यातून बाहेर काढलेल्या या इसमाने खुद्द हा बोगदा बनवला असुन या बोगद्याद्वारे जवळच्या बॅंकेत (Bank) डल्ला मारण्याचा प्लॅन (Plan) होता. पण बोगदा कोसळला आणि या चोराचं प्लॅनिंग देखील. सोशल मिडीयावर (Social Media) सध्या हा व्हिडीओ (Video) जोरदार व्हायरल (Viral) होत असुन क्या चोर बनेगा रे तु सारखे भन्नाट मजेशीर मीम्स (Meme) व्हायरल होत आहेत.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)