Python In Car Engine: कारच्या इंजिनमध्ये लपला होता 6 फूट लांबीचा अजगर; VIDEO पाहून अंगावर येईल काटा (Watch)

सुमारे 1.30 तासांच्या अथक परिश्रमानंतर अजगराला बाहेर काढून वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले.

Python In Car Engine

दिल्लीतील एका व्यक्तीला त्याच्या गाडीच्या इंजिनच्या डब्यात एक सहा फूट लांबीचा अजगर लपून बसलेला आढळून आला आहे. गाडीच्या इंजिनमध्ये महाकाय प्राण्याला पाहून या व्यक्तीला धक्काच बसला. दिल्लीच्या चित्तरंजन पार्क परिसरात ही घटना समोर आली आहे. सध्या हा अजगराचा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओ क्लिपमध्ये कारच्या इंजिनमध्ये भला मोठा अजगर दिसत आहे. अजगर दिसून आल्यानंतर कार मालकाने 'वाइल्डलाइफ एसओएस'शी संपर्क साधला. त्यानंतर पोलीस आणि वन अधिकाऱ्यांसह बचाव पथक घटनास्थळी पोहोचले. सुमारे 1.30 तासांच्या अथक परिश्रमानंतर अजगराला बाहेर काढून वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले. हा एक 6 फुट लाबिचा इंडियन रॉक पायथन असल्याचे सांगितले जात आहे. (हेही वाचा: MG! कुत्र्याने मारली बांधकामाधीन इमारतीच्या 5व्या मजल्यावरून उडी, व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणालं व्वा!! Watch Viral Video)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement