Nandi Idol 'Drinking' Milk Video: उत्तर प्रदेश येथील मंदिरात नंदी दुध पीत असल्याचा दावा; 'चमत्कार' पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी (Watch)

पिनाहाट परिसरात रविवारी सकाळी मंदिरात लोटा, वाटी आणि चमच्याने नंदीला दूध अर्पण भाविक जमले होते.

Nandi

सध्याच्या तंत्रज्ञानाच्या, विज्ञानाच्या युगात आजही देशात अनेक लोक चमत्कारांवर विश्वास ठेवतात. विविध चमत्काराबाबत अनेक अफवा रोज समोर येत असतात. आता उत्तर प्रदेशमध्ये अलीगढ येथील नंदीची मूर्ती दुध पीत असल्याची अफवा समोर आली आहे. यानंतर अफवेवर विश्वास ठेऊन लोकांनी मंदिरांमध्ये प्रचंड गर्दी केली होती. नंदीला दूध पाजण्याची लोकांमध्ये स्पर्धा लागली होती. पिनाहाट परिसरात रविवारी सकाळी मंदिरात लोटा, वाटी आणि चमच्याने नंदीला दूध अर्पण भाविक जमले होते. आजूबाजूच्या अनेक गावातील लोक या मंदिरात आले होते. सायंकाळी उशिरापर्यंत मंदिरामध्ये लोक नंदीला दूध पाजत होते.

शास्त्रानुसार मूर्ती दूध, पाणी किंवा कोणतेही द्रव पिणे हा चमत्कार नाही. हे पृष्ठभागावरील तणाव आणि केपलरियन बलामुळे होते. मूर्तीला अनेक छिद्रे असतात व त्यातून द्रव पदार्थ आत पाझरतो. बहुतेक दूध खालून बाहेर पडत असले तरी मूर्ती दूध पीत असल्याची भावना लोकांच्या मनामध्ये निर्माण होते. (हेही वाचा: Dead Rat Found In Dish Served: लुधियाना येथील प्रसिद्ध रेस्टॉरंटमध्ये ग्राहकाला दिलेल्या भाजीमध्ये सापडला मृत उंदीर; Watch Video)

Nandi Idol 'Drinking' Milk Video- 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif