Mumbai Police: वाहतूक नियमनादरम्यान पो.ह. राजेंद्र सोनवणे यांनी केली दिव्यांग नागरिकाची मदत; मुंबई पोलिसांनी शेअर केला हृदयस्पर्शी व्हिडिओ (Watch Video)

विभागाने एक हृदयस्पर्शी व्हिडिओ शेअर केला आहे, जो पाहून तुम्हाला नक्कीच आपल्या मुंबई पोलिसांचा अभिमान वाटेल

Mumbai Police (Photo Credit : Instagram)

मुंबई पोलीस वरचेवर लोकांना विविध सुरक्षा नियम आणि मार्गदर्शक तत्त्वांची आठवण करून देणारे व्हिडिओ किंवा फोटोज पोस्ट करत असतात. काही वेळा, ते लोकांमध्ये जागरूकता पसरवण्याच्या उद्देशानेही पोस्ट करत असतात. मात्र नुकतेच विभागाने एक हृदयस्पर्शी व्हिडिओ शेअर केला आहे, जो पाहून तुम्हाला नक्कीच आपल्या मुंबई पोलिसांचा अभिमान वाटेल. मुंबई पोलीसांचे ब्रीदवाक्य प्रत्यक्षात उतरवत असताना कर्तव्यदक्ष पोलीस पो.ह. राजेंद्र सोनवणे यांनी वाहतूक नियमनादरम्यान एका दिव्यांग नागरिकाला हाताला धरून त्याला रस्ता ओलांडण्यासाठी मदत केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mumbai Police (@mumbaipolice)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now