Mumbai: आपल्या कर्तव्याच्या पलीकडे जाऊन मुंबई वाहतूक पोलिसाने केली शाळकरी मुलांना रस्ता ओलांडण्यास मदत, Watch Viral Video

व्हिडीओमध्ये दिसत आहे की, वाहतूक पोलीस मुलांना अगदी सावकाशपणे रस्ता ओलांडण्यासाठी मदत करत आहे

Mumbai Traffic Cop (संग्रहित संपादित प्रतिमा)

मुंबई वाहतूक पोलीस हे नेहमीच नागरिकांच्या मदतीसाठी तत्पर असतात. याचा प्रत्यय येणारी अनेक उदाहरणे समोर आली आहे. आता मुंबई वाहतूक पोलिसाने आपल्या कर्तव्याच्या पलीकडे जाऊन, दोन शाळकरी मुलांना वांद्रे वाहतूक विभागाबाहेरचा रस्ता सुरक्षितपणे ओलांडण्यास मदत केली. या पोलिसाचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, वाहतूक पोलीस मुलांना अगदी सावकाशपणे रस्ता ओलांडण्यासाठी मदत करत आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर सोशल मिडियावर या पोलिसाचे कौतुक होत आहे.

पहा व्हिडीओ-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)