Mumbai: लोकलमध्ये चढताना 50 वर्षीय महिलेचा गेला तोल; महिला आरपीएफ कॉन्स्टेबलनी वाचवले प्राण (Watch Video)

सँडहर्स्ट रोड रेल्वे स्थानकावर आज एक मोठा अपघात होता होता टळला. तर स्टेशनवर दुपारी 3 च्या सुमारास बदलापूर लोकल ट्रेन आली

Sandhurst Road Railway Station (संग्रहित संपादित प्रतिमा)

सँडहर्स्ट रोड रेल्वे स्थानकावर आज एक मोठा अपघात होता होता टळला. तर स्टेशनवर दुपारी 3 च्या सुमारास बदलापूर लोकल ट्रेन आली. त्यावेळी 50 वर्षीय महिला प्रवासी, महिला जनरल डब्यात चढण्याचा प्रयत्न करत होती. त्यावेळी तिचा तोल गेला व ती खाली पडली. प्रसंगावधान पाहून स्टेशनवर तैनात महिला आरपीएफ कॉन्स्टेबल सपना गोलकर धावत आल्या व त्यांनी या महिला प्रवाशाचा जीव वाचवला. रेल्वेने सपना यांचे कौतुक केले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now