Modi Ji Thali: न्यू जर्सीमधील मराठी रेस्टॉरंट मालकाने लाँच केली खास 'मोदी जी थाळी'; कोथिंबीर वडीपासून इडलीपर्यंत अनेक गोष्टींचा समावेश (Watch)
यावेळी तेथे उपस्थित असलेल्या काही भारतीय समुदायाने जेवण उत्कृष्ट असल्याचे सांगितले. एका व्यक्तीने सांगितले की, न्यू जर्सीमध्ये मोदीजी थालीला पसंती दिली जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 21 ते 24 जून या कालावधीत अमेरिकेच्या पहिल्या राजकीय दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी दोन्ही देशांदरम्यान अनेक प्रकारच्या करारांवर स्वाक्षऱ्याही होऊ शकतात. आता पंतप्रधान मोदींच्या आगामी अमेरिकेच्या दौऱ्यापूर्वी, न्यू जर्सीमधील एका रेस्टॉरंटने त्यांच्या नावाची थाली सुरू केली आहे. रेस्टॉरंटचे मराठी मालक श्रीपाद कुलकर्णी यांनी एका व्हिडिओमध्ये सांगितले की, पीएम मोदींच्या आगामी अमेरिका दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या नावाने एक थाली लॉन्च करण्यात आली आहे, ज्याचे नाव 'मोदी जी थाली' असे आहे.
रेस्टॉरंटचे मालक कुलकर्णी म्हणाले की, ‘भारतीय समुदायाच्या मागणीनुसार आम्ही मोदीजींची खास थाली बनवली आहे. या थाळीमध्ये खिचडी, रसगुल्ला, सरसो का साग, दम आलू सब्जी, इडली, कोथिंबीर वडी, ढोकळा, ताक, पापड इ. गोष्टी आहेत.’ यावेळी तेथे उपस्थित असलेल्या काही भारतीय समुदायाने जेवण उत्कृष्ट असल्याचे सांगितले. एका व्यक्तीने सांगितले की, न्यू जर्सीमध्ये मोदीजी थालीला पसंती दिली जात आहे. आम्हा सर्वांना ही थाळी खूप आवडली आहे. (हेही वाचा: Pune: 'बायकोने मला हरवलं', जपानचे राजदूत Hiroshi Suzuki यांनी पुण्यात पत्नीसह घेतला मिसळ पाव आस्वाद; पहा व्हिडिओ)