Mathura: माकडाने पळवला DM चा चष्मा; अथक प्रयत्नानंतर 'असा' परत मिळवला (Viral Video)
जिल्हादंडाधिकार्यांना काही समजेपर्यंत, सुरक्षा कर्मचार्यांच्या काही लक्षात येईपर्यंत माकड चष्मा घेऊन निघूनही गेले होते.
मथुरा येथे जिल्हा दंडाधिकारी नवनीत सिंह चहल आणि एसएसपी अभिषेक यादव बांके बिहारी मंदिर आणि आसपासच्या परिसराची पाहणी करत असताना, अचानक माकडाने डीएमच्या डोळ्यांवरील चष्मा पळवून नेल्याची घटना घडली आहे. डोळ्याची पापणी लवतेय न लवतेय तोपर्यंत कडक बंदोबस्त असूनही, माकडाने डीएमचा चष्मा पळवला. जिल्हादंडाधिकार्यांना काही समजेपर्यंत, सुरक्षा कर्मचार्यांच्या काही लक्षात येईपर्यंत माकड चष्मा घेऊन निघूनही गेले होते. खूप प्रयत्नांनंतर जेव्हा स्थानिकांनी माकडाला फ्रूटीचे आमिष दाखवले तेव्हा कुठे माकड जवळ आले. त्यानंतर जेव्हा शिपाई माकडाच्या मागे धावले तेव्हा माकड चष्मा सोडून पळून गेले. सध्या या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Pune Drink Driving Cases: पुण्यात 2024 मध्ये पोर्श अपघातानंतर ड्रिंक ड्रायव्हिंगच्या 2,097 प्रकरणांमध्ये कारवाई; हेल्मेट, नो पार्किंग आणि टिंटेड चष्मा नियमांचे उल्लंघन झाले कमी
Pimpri Chinchwad Police: फॅन्सी नंबर प्लेट, टिंटेड ग्लास चा मोह टाळा - पिंपरी चिंचवड पोलीस; दिवसभराच्या कारवाई मध्ये 4.37 लाखांचा दंड केला जमा
JioGlass First Look: जिओने आणला अद्वितीय चष्मा 'जिओग्लास'; फोनची छोटी स्क्रीन 100 इंच मोठी होणार, जाणून घ्या सविस्तर
Altina Schinasi's 116th Birthday Google Doodle: आयकॉनिक Cat-Eye Glasses च्या निर्मात्या अल्टिना शिनासी च्या 116 व्या जन्मदिना निमित्त खास गूगल डूडल
Advertisement
Advertisement
Advertisement