Fire At Poonam Chamber Building In Worli: वरळीतील पूनम चेंबर इमारतीला भीषण आग; घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 10 गाड्या दाखल (Watch Video)

सात मजली व्यावसायिक इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. आग इतर मजल्यांवर पसरू नये यासाठी अग्निशमन दलाचे जवान काम करत आहेत.

Fire At Poonam Chamber Building In Worli (फोटो सौजन्य - IANS)

Fire At Poonam Chamber Building In Worli: मुंबईतील वरळी भागातील एनी बेझंट रोडवरील आरतीया मॉलसमोर असलेल्या पूनम चेंबर इमारतीला रविवारी भीषण आग (Fire) लागली. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या दहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी टीम अथक परिश्रम करत आहेत. सात मजली व्यावसायिक इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. आग इतर मजल्यांवर पसरू नये यासाठी अग्निशमन दलाचे जवान काम करत आहेत. आतापर्यंत, कोणत्याही दुखापतीचे वृत्त नाही. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून, अधिकारी या घटनेचा तपास करत आहेत. अग्निशमन दल, पोलीस, बेस्टचे अधिकारी आणि रुग्णवाहिका सर्व चालू ऑपरेशनमध्ये मदत करण्यासाठी घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

वरळीतील पूनम चेंबर इमारतीला भीषण आग, पहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now