Mankhurd Auto Driver's Beating Passenger: मानखुर्द रेल्वे स्थानकाजवळ ऑटो चालकाची प्रवाशाला बेदम मारहाण (Watch Video)

यावेळी इतर रिक्षा चालक या व्यक्तीला थांबवण्याचा प्रयत्न करतात. मात्र, तरीदेखील रिक्षा चालक प्रवाशाला मारहाण करताना दिसत आहे.

Mankhurd Auto Driver's Beating Passenger (फोटो सौजन्य - x/@GovandiCell)

Mankhurd Auto Driver's Beating Passenger: मानखुर्द रेल्वे स्थानकाजवळ (Mankhurd Railway Station) ऑटो चालकाने (Auto Driver) प्रवाशाला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये रिक्षा चालक एका व्यक्तीला पट्ट्याने मारहाण करताना दिसत आहे. यावेळी इतर रिक्षा चालक या व्यक्तीला थांबवण्याचा प्रयत्न करतात. मात्र, तरीदेखील रिक्षा चालक प्रवाशाला मारहाण करताना दिसत आहे. यावेळी रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. हा व्हिडिओ एक्सवर @GovandiCell या नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.

पहा व्हिडिओ -

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)