Man Died While Dancing: लग्नामध्ये डान्स करताना व्यक्तीला आला हृदयविकाराच्या झटका; जागीच झाला मृत्यू (Watch Video)
तुर्कियेमधील ओरडू येथे लग्नात सर्वांसोबत नाचत असताना एका नागरिकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे.
गेल्या काही महिन्यांमध्ये अचानक हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. आता असाच तुर्कियेमधील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जिथे एका व्यक्तीचा लग्नात अचानक मृत्यू झाला आहे. तुर्कियेमधील ओरडू येथे लग्नात सर्वांसोबत नाचत असताना एका नागरिकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, 50-60 वयोगटातील एक व्यक्ती लग्नामध्ये इतर पाहुण्यांच्यासोबत नृत्य करत आहे. अचानक त्याला हृदयविकाराच्या झटका येतो व तो खाली कोसळतो. त्यानंतर त्याचा मृत्यू होतो. (हेही वाचा: Cyclone In Brazil: ब्राझीलमध्ये चक्रीवादळ; 20 जणांचा मृत्यू, शेकडो बेघर)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)