Live Snail in Salad: फूड डिलिव्हरी अॅप स्विगी द्वारे ऑर्डर केलेल्या सॅलडमध्ये आढळली जिवंत गोगलगाय; व्हिडिओ व्हायरल, कंपनीने दिली 'ही' प्रतिक्रिया (Watch)

नऊ सेकंदांच्या या व्हिडिओ फुटेजमध्ये सॅलडने भरलेला एक वाडगा दिसतो, ज्यामध्ये काही भाज्या आहेत आणि त्यांच्यासोबत एक जिवंत गोगलगायही दिसत आहे.

Live Snail in Salad

बेंगळूरू येथील एका व्यक्तीने ऑनलाइन ऑर्डर केलेल्या जेवणात चक्क जिवंत गोगलगाय आढळल्याची घटना समोर आली आहे. या व्यक्तीने फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म स्विगीद्वारे सॅलडची ऑनलाइन ऑर्डर दिली होती. या सॅलडमध्ये त्याला जिवंत गोगलगाय आढळली आहे. त्याने या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना त्याने लिहिले, ‘स्विगी, हे इतरांसोबत घडू नये याची खात्री करण्यासाठी जे काही करता येईल ते करा... बेंगळुरूच्या लोकांनी याची नोंद घ्यावी.’ नऊ सेकंदांच्या या व्हिडिओ फुटेजमध्ये सॅलडने भरलेला एक वाडगा दिसतो, ज्यामध्ये काही भाज्या आहेत आणि त्यांच्यासोबत एक जिवंत गोगलगायही दिसत आहे. ही पोस्ट 15 डिसेंबर रोजी शेअर करण्यात आली होती. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कंपनीने या पोस्टवर प्रतिक्रिया देत याची चौकशी केली जाईल असे म्हटले आहे. या व्यक्तीने Leon Grill या ठिकाणाहून ही ऑर्डर केली होती. (हेही वाचा: Dog Attack in Hyderabad Video: अपार्टमेंटच्या बाहेर भटक्या कुत्र्याचा 5 वर्षीय मुलावर हल्ला, चिमुरडा जखमी)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)