Leopard Enters in Hotel: जयपूरच्या हेरिटेज हॉटेलमध्ये घुसला बिबट्या; तब्बल दोन तास अथक प्रयत्नानंतर पकडण्यात यश, जीवितहानी नाही (Watch Video)

एका पर्यटकाने बिबट्या पाहिल्यानंतर तातडीने हॉटेल कर्मचाऱ्यांना माहिती दिली.

Leopards | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

Leopard Enters Jaipur's Heritage Hotel: गुरुवारी जयपूरमधील कॅसल कनोटा हेरिटेज हॉटेलमध्ये बिबट्या घुसल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली होती. याची माहिती मिळताच हॉटेलमध्ये उपस्थित असलेल्या लोकांनी जीव वाचवण्यासाठी बाहेर धाव घेतली. हॉटेल कर्मचाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी 9.50 च्या सुमारास बिबट्या हॉटेल कर्मचाऱ्यांच्या खोलीत घुसला होता. हॉटेलचे कर्मचारी, स्थानिक अधिकारी आणि वन्यजीव बचाव पथक तब्बल दोन तास बिबट्याला शांत करून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते.

हॉटेलमधील कुत्र्यांनी अचानक भुंकायला सुरुवात केल्यानंतर हॉटेलच्या रूममध्ये बिबट्या घुसल्याची बाब समोर आली. एका पर्यटकाने बिबट्या पाहिल्यानंतर तातडीने हॉटेल कर्मचाऱ्यांना माहिती दिली. हॉटेल मालक मानसिंग यांनी सकाळी 10 वाजता वनविभागाच्या पथकाला तातडीने सूचना दिली. त्यानंतर हॉटेल रिकामे केले. नंतर वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून बिबट्याला यशस्वीरित्या शांत केले. सुदैवाने संपूर्ण बचाव कार्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. बिबट्याला नाहरगढ बचाव केंद्रात नेण्यात आले आहे, जिथे त्याला जंगलात सोडण्यापूर्वी प्राथमिक उपचार केले जातील. (हेही वाचा: Leopard Skin & Nails Dumped In Lake: आरे जंगलातील तलावात आढळली बिबट्याची कातडी आणि नखे; चौकशी सुरू)

पहा व्हिडिओ- 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)