Snake in Bed: तरुणाच्या अंथरुणात शिरला किंग कोब्रा, पुढे जे झाले ते पाहून बसेल धक्का, पाहा व्हिडीओ
तरुणाला गुदगुल्या झाल्या त्यामुळे तो उठला तर त्याला एक विषारी साप दिसला. तरुण घाबरून दुसऱ्या खोलीत पळाला, पुढे काय झाले पाहा व्हिडीओ
Snake in Bed: सागरजवळील सिरोंजा गावात एका तरुणाच्या अंथरुणात विषारी साप शिरला. तरुणाला गुदगुल्या झाल्या त्यामुळे तो उठला तर त्याला एक विषारी साप दिसला. तरुण घाबरून दुसऱ्या खोलीत पळाला. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, एक साप स्पष्ट दिसत आहे . सुमारे 5 फूट लांब हा कोब्रा थंडी तरुणाच्या रजईमध्ये घुसला होता. रात्री दीडच्या सुमारास हरगोविंद यांना झोपेत हालचाल जाणवली. खोलीची लाईट चालू होती. साप पाहून हरगोविंद चांगलेच घाबरले. यानंतर ते खोलीबाहेर आले आणि खोलीला बाहेरून कुलूप लावले. सकाळी सहाच्या सुमारास सर्पमित्राला बोलावून साप पकडला.
पाहा व्हिडीओ :
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)