Kerala: केरळमधील पूरात पार पडले अनोखे लग्न; स्वयंपाकाच्या भांड्यात बसून वधू-वर पोहोचले विवाहस्थळी (Watch Video)

या जोडप्याला अलाप्पुझाजवळील Panayannurkavu Devi मंदिरामध्ये लग्न करायचे होते. परंतु हा रस्ता पुराच्या पाण्याने भरला असल्याने, या दोघांना एका मोठ्या स्वयंपाकाच्या भांड्यात बसवून तिथे नेण्यात आले

Kerala Wedding (Photo Credit: Twitter):

केरळमधील पुराच्या दरम्यान, अलाप्पुझा मधील एक लग्न सध्या चर्चेचा विषय ठरले आहे. सध्या केरळमध्ये पुरामुळे भयानक परिस्थिती आहे. अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. रस्ते खराब झाले आहेत. काही ठिकाणी रस्त्यांवर गुडघ्यापर्यंत पाणी साचले आहे. अशावेळी वधू आणि वर एका मोठ्या जेवणाच्या  भांड्यात बसून लग्नस्थळी पोहचले आहेत. त्यांच्या या प्रवासाचा व्हिडिओव्हायरल झाला आहे. आकाश आणि ऐश्वर्या असे हे जोडपे आरोग्य सेवक आहेत. त्यांनी सोमवारी लग्न केले.

या जोडप्याला अलाप्पुझाजवळील Panayannurkavu Devi मंदिरामध्ये लग्न करायचे होते. परंतु हा रस्ता पुराच्या पाण्याने भरला असल्याने, या दोघांना एका मोठ्या स्वयंपाकाच्या भांड्यात बसवून तिथे नेण्यात आले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now