Kashi Vishwanath Temple Viral Video: काशी विश्वनाथ मंदिरामध्ये स्पर्श दर्शनाच्या वेळी 'गर्भ गृहात' पडली महिला भाविक; व्हिडिओ वायरल (Watch Video)
काशी विश्वेश्वर मंदिरातील ही पहिलीच घटना नाही. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्येही अशीच एक घटना समोर आली होती, ज्याने प्रशासकीय कारवाईला सूचित केले होते.
वाराणसी मध्ये काशी विश्वेनाथ मंदिरात गर्भगृहामध्ये एक महिला स्पर्श दर्शनाच्या वेळी पडल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. सोशल मीडीयात तो व्हिडिओ वायरल झाला आहे. महिला आत पिंडीजवळ पडल्यानंतर ताबडतोब पुजारी धावले आणि तिला बाहेर काढलं. या घटनेमुळे मंदिरातील सुरक्षेचा प्रश्न समोर आला आहे. भविष्यात अशा घटना घडू नये म्हणून काळजी घेतली जाईल असं मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
काशी विश्वेश्वर मंदिरात पहा काय घडलं?
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)