Indonesian Delegation Sings 'Kuch Kuch Hota Hai' Song: इंडोनेशियन शिष्टमंडळाने आपल्या अंदाजात 'कुछ कुछ होता है' गात जिंकली मनं (Watch Video)

इंडोनेशियाच्या शिष्टमंडळाने बॉलिवूडचं गाणं आपल्या अंदाजात गात उपस्थितांची मनं जिंकली आहेत. यावेळी त्यांनी 'कुछ कुछ होता है' गाणं गायलं.

Indonesian delegation at Rashtrapati Bhavan (Photo Credits: AN,/Instagram)

यंदा भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष Prabowo Subianto प्रमुख पाहुणे म्हणून आले आहेत. शनिवारी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला आयोजित कार्यक्रमात इंडोनेशियाच्या शिष्टमंडळाने बॉलिवूडचं गाणं आपल्या अंदाजात गात उपस्थितांची मनं जिंकली आहेत. यावेळी त्यांनी 'कुछ कुछ होता है' गाणं गायलं. करण जोहर दिग्दर्शित 'कुछ कुछ होता है' च्या टायटल ट्रॅक मध्ये शाहरूख खान, राणी मुखर्जी, काजोल झळकली होती. जतीन ललितने हे गाणं बनवलं असून उदीत नारायण आणि अल्का याज्ञिक ने ते गाणं गायलं आहे.

इंडोनेशियन शिष्टमंडळाचं 'कुछ कुछ होता है' 

 

View this post on Instagram

 

A post shared by DD India (@ddindialive)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now