Viral Video: उल्हासनगरमध्ये भररस्त्यात चालू स्कूटीवर तरुणीने स्वत:सह बॉयफ्रेंडला घातली अंघोळ; सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी व्यक्त केला संताप, Watch

सार्वजनिक ठिकाणी उन्हापासून वाचण्यासाठी किंवा मनोरंजनासाठी केलंल हे कृत्य अनेक यूजर्संना आवडलेलं नाही. यावर नेटकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून संबंधितावर कारवाईची मागणी केली आहे.

Ulhasnagar Viral Video (PC - Twitter)

Viral Video: सध्या सोशल मीडियावर उल्हासनगरमधील (Ulhasnagar) एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल (Viral Video) होत आहे. या व्हिडिओमध्ये एक तरुणी भररस्त्यात चालू स्कूटीवर स्वत: वर पाणी ओतून घेताना दिसत आहे. एवढचं नाही तर स्कूटी चालवणाऱ्या तरुणावरीही ती पाणी ओतताना दिसत आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत आहे. अनेकांनी या दोघांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सध्या सर्वत्र उन्हाचा तडका वाढू लागला आहे. त्यामुळे अनेकजण उन्हापासून संरक्षण करण्यासाठी छत्री किंवा टोपीचा वापर करताना दिसत आहेत. परंतु, सार्वजनिक ठिकाणी उन्हापासून वाचण्यासाठी किंवा मनोरंजनासाठी केलंल हे कृत्य अनेक यूजर्संना आवडलेलं नाही. यावर नेटकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून संबंधितावर कारवाईची मागणी केली आहे. (हेही वाचा - Girl Drinking Liquor: तरुणीने एका घोटात गिळली ग्लासभर दारू, नंतर अशी दिली प्रतिक्रिया, Watch Video)

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement