Viral Video: भरदिवसा विद्यार्थिनीला पिस्तुल दाखवून लुटली गळ्यातील साखळी; भाजप आमदाराचा पंजाब सरकारवर गंभीर आरोप
हा व्हिडिओ देवरियाचे भाजप आमदार डॉ. शलभ मणि त्रिपाठी यांनीही शेअर केला आहे. त्यांनी लिहिले, "हे केजरीवाल जींचे "पंजाब मॉडेल" आहे, त्यांना पोलिस हवे होते, पोलिसांच्या संरक्षणात खून करण्यासाठी."
Viral Video: पंजाबमधील तरनतारनमध्ये एका चोरट्याने बंदुकीच्या धाकावर तरुणीच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून नेली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ देवरियाचे भाजप आमदार डॉ. शलभ मणि त्रिपाठी यांनीही शेअर केला आहे. त्यांनी लिहिले, "हे केजरीवाल जींचे "पंजाब मॉडेल" आहे, त्यांना पोलिस हवे होते, पोलिसांच्या संरक्षणात खून करण्यासाठी."
कॅमेऱ्यात कैद झालेल्या या घटनेत दोन मुली रस्त्यावरून जात असल्याचे दिसत आहे. एक माणूस मागून त्यांच्याकडे येतो आणि हातात पिस्तुल घेऊन मुलीकडून गळ्यातली साखळी हिसका घेतो. पण स्कूटीवर मागे बसलेली मुलगी प्रतिकार करते. त्याचवेळी एक वृद्ध व्यक्तीही त्या चोरट्याला रोखण्याचा प्रयत्न करते. मात्र पिस्तुल पाहून तोही मागे हटतो. मुलीच्या गळ्यातील चेन हिसकावून चोरटा फरार झाल्याचंही या व्हिडिओमध्ये दिसत आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)