Python Stucks Into Power House: लखनऊमध्ये वीज मीटरच्या कुंपणात घुसला महाकाय अजगर; बाहेर काढण्यासाठी करावा लागला वीजपुरवठा ठप्प (Watch Video)

लखनऊमध्ये एका महाकाय अजगरामुळे वीजपुरवठा ठप्प करावा लागल्याची घटना घडली आहे. महाकाय अजगर वीज मीटरच्या कुंपणात घुसला आणि तेथेच तो अडकला होता.

Photo Credit- X

Python Stucks Into Power House: लखनऊमध्ये एक महाकाय अजगर (Python)वीज मीटरच्या कुंपणात घुसल्याची घटना घडली. त्यानंतर तो तेथेच अडकला (Python Stucks Into Power House). त्याला तारेच्या कुंपणातून बाहेर काढण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागले. पहिल्यांदा तर अजगर पाहून स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर त्यांनी वन विभाग आणि महावितरण प्रशासनाला त्याबाबतची माहिती दिली. त्यानंतर काही वेळात अजगराला बाहेर कााढण्याचे काम सुरू करण्यात आले होते. गेल्या वर्षी लखनऊमधील सरकारी कार्यालये असलेल्या शक्ती भवन या इमारतीत एक साप आढळला होता. (हेही वाचा:Ganpati Bappa on Bullock Cart: मुंबईच्या रस्त्यावर थेट बैलगाडीतून बाप्पाचे आगमन; व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून कमेंटचा पाऊस (Watch Video) )

वीज मीटरच्या कुंपणात घुसला महाकाय अजगर

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now