Watch Video: झेंडा उंचा रहे हमारा! स्वत:च्या प्राणाची बाजी लावत फायर ब्रिगेडच्या जवानाने आगीतून काढला तिरंगा
आग लागलेल्या या कंपनीच्या छतावर तिरंगा लागलेला होता. या तिरंग्यास काही होवू नये म्हणून अग्निशाम दलाच्या एका जवानाने थेट स्वतचा जीव धोक्यात घालत छतावरचा तिरंगा सुखरुप खाली काढला.
हरीयाणातील पानिपत येथे एका कंपनीत भीषण आग लागली. दरम्यान आग विझवण्यासाठी घटनास्थळी एक अग्निशामक दलाची गाडी पोहोचली आणि अग्निशमक दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करण्यात आले. तरी आग लागलेल्या या कंपनीच्या छतावर तिरंगा लागलेला होता. या तिरंग्यास काही होवू नये म्हणून अग्निशाम दलाच्या एका जवानाने थेट स्वतचा जीव धोक्यात घालत छतावरचा तिरंगा सुखरुप खाली काढला. तरी अग्निशामक दलाच्या सैनिकाच्या शौर्याची दाद देणारा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल होत आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)