कर्नाटक मध्ये रात्रीच्या वेळी अखंड वीज पुरवठा मिळावा म्हणून आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांनी सब स्टेशन मध्ये आणली मगर (Watch Video)

वीज कार्यालयात पोहोचल्यावर अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी प्रश्न केली की रात्रीच्या वेळी साप, विंचू किंवा मगरीने चावल्याने मृत्यू झाल्यास काय करणार?

crocodile | Twitter

कर्नाटक मध्ये रात्रीच्या वेळी अखंड वीज पुरवठा मिळावा म्हणून आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांनी चक्क मगर आणली आहे. हा प्रकार कर्नाटक मधील आहे. कर्नाटकच्या विजयपुरा जिल्ह्यातील शेतकरी हुबळी इलेक्ट्रिसिटी सप्लाय कंपनी लिमिटेडच्या सब स्टेशन मध्ये ही मगर घेऊन पोहचले होते. रोनिहाळा गावातील शेतात शेतकर्‍यांना मोठी मगर दिसली. नंतर त्यांनी मगरीची सुटका करून वीज केंद्रात नेले. वीज कार्यालयात पोहोचल्यावर  अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी प्रश्न केली की रात्रीच्या वेळी साप, विंचू किंवा मगरीने चावल्याने मृत्यू झाल्यास काय करणार?

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)