Ashadhi Ekadashi 2024: आषाढी एकादशी च्या निमित्ताने पुण्यात एका अभियंताने शेतात साकारलं विठू माऊलीचं अनोखं रूप (Watch Video)
एका अभियंता शेतकर्याने शेतामध्ये भाताची पेरणी करून आषाढीच्या पूर्वसंध्येला विठू माऊलीचं रूप जगासमोर आणलं आहे.
पुण्याजवळील मुळशी गावात, शिंदे नावाच्या अभियंता असलेल्या शेतकऱ्याने आषाढी एकादशीनिमित्त आपल्या भाताच्या शेतात विठ्ठल माऊलींचे रूप साकारले आहे. 120 फूट उंची आणि 60 फूट रुंदीच्या या कलाकृतीने दैवी दर्शन घडवले आहे. paddy plantations च्या मदतीने त्याने ही कलाकृती साकारली आहे. आषाढी एकादशी 17 जुलै म्हणजे उद्याच साजरी केली जाणार आहे. यानिमित्ताने कानाकोपर्यातून वारकरी पायी करत पंढरपूरला पोहचतात.
शेतात साकारलं विठ्ठलाचं रूप
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)