Fanta Maggi Viral Video: गाझियाबाद मध्ये स्टॉल वर विकली जाते फॅन्टा मॅगी; अजब पाहून सोशल मीडीया युजर्स झाले आवाक

गाझियाबाद मध्ये एक स्टॉल विक्रेता मागील 4-6 महिन्यांपासून ही फॅन्टा मॅगी बनवत असल्याचं समोर आलं आहे. युट्युबवर त्याचा एक व्हिडिओ असून 13 हजारापेक्षा अधिक व्ह्यूज या व्हिडिओला मिळाले आहेत.

Fanta Maggi | YouTube

भूक लागल्यावर झटपट तयार होणार्‍या पदार्थांपैकी एक म्हणजे 'मॅगी न्यूडल्स'. अनेक भारतीयांच्या तो आवडीचा पदार्थ आहे. दरम्यान व्यक्ती तितक्या प्रकृती म्हटलं जात आणि त्यानुसार प्रत्येकाची मॅगी बनवण्याची आणि चाखण्याची पद्धतही वेगवेगळी आहे. मॅगीचे अनेक प्रकार सोशल मीडीयामधून समोर आले आहेत पण सध्या सोशल मीडियात पाण्याऐवजी फॅन्टा मध्ये उकळलेली एक मॅगी तुफान चर्चेमध्ये आहे. गाझियाबाद मध्ये एक स्टॉल विक्रेता मागील 4-6 महिन्यांपासून ही फॅन्टा मॅगी बनवत असल्याचं समोर आलं आहे.  युट्युबवर त्याचा एक व्हिडिओ असून 13 हजारापेक्षा अधिक व्ह्यूज या व्हिडिओला मिळाले आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement