Fact Check: SBI युजर्सनी व्हा सावध; PAN नंबर अपडेट करण्याच्या बहाण्याने होत आहे फसवणूक, जाणून घ्या सत्य
भारत सरकारची प्रेस एजन्सी प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो म्हणजेच पीआयबीने या व्हायरल मेसेजची सत्यता सांगितली आहे.
जर तुमचे खाते देशातील सर्वात मोठ्या बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये असेल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. एसबीआय खात्याबाबत सोशल मीडियावर एक मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मेसेजमध्ये म्हटले आहे की, जर ग्राहकाने त्यांचा पॅन नंबर अपडेट केला नाही तर बँक त्यांचे खाते बंद करेल. या मेसेजमध्ये एक लिंक देण्यात आली आहे व त्यावर क्लिक करून युजर्सना पॅन कार्ड अपडेट करण्यास सांगण्यात आले आहे.
भारत सरकारची प्रेस एजन्सी प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो म्हणजेच पीआयबीने या व्हायरल मेसेजची सत्यता सांगितली आहे. पीआयबीने त्यांच्या तथ्य तपासणीत हे दावे खोटे असल्याचे म्हटले आहे. पीआयबीने आपल्या फॅक्ट चेक अकाउंटवरून ट्विट केले आणि म्हटले की, ‘स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नावाने पाठवलेला संदेश पूर्णपणे बनावट आहे. एसबीआय कोणालाही मेसेजद्वारे त्यांची वैयक्तिक माहिती अपडेट करण्यास सांगत नाही.’
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)