Navi Mumbai: कुत्र्याच्या ग्रँड लग्नाचा व्हिडिओ व्हायरल; मोठा थाटात इलेक्ट्रिक कारमध्ये आला नवरदेव; तर 'वधू' आली पालखीत बसून, Watch Viral Video
हा काही छोटासा कार्यक्रम नव्हता, पण सामान्य विवाहसोहळ्यांप्रमाणे यातही अनेक पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले होते.
Navi Mumbai: आतापर्यंत तुम्ही अनेक विवाहसोहळ्यांना हजेरी लावली असेल, पण आज आम्ही ज्या लग्नाबद्दल बोलणार आहोत, ते तुम्ही याआधी क्वचितच पाहिले असेल. सोशल मीडियावर व्हायरल झालेली क्लिप अशा कोणत्याही लग्नाची नाही. यामध्ये एक कुटुंब आपल्या पाळीव कुत्र्याचे हिंदू रितीरिवाजांनुसार मोठ्या थाटामाटात लग्न करताना दिसत आहे. होय, तुम्ही अगदी बरोबर वाचले आहे. या भव्य सोहळ्यात 'वर' गाडीतून एन्ट्री करतो. तर 'वधू' डोलीतून येते.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक कुटुंब आपल्या पाळीव कुत्र्याचे लग्न लावून देत असल्याचे दिसत आहे. हा काही छोटासा कार्यक्रम नव्हता, पण सामान्य विवाहसोहळ्यांप्रमाणे यातही अनेक पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले होते. व्हिडीओमध्ये 'वर' इलेक्ट्रिक टॉय कारमध्ये बसून समारंभात एंट्री घेत असल्याचे पाहायला मिळत आहे. तर 'वधू'ची एंट्रीही पाहण्यासारखी आहे. हा व्हिडीओ जुना आहे. परंतु, सध्या तो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 24 जानेवारी 2023 रोजी नवी मुंबईत हे लग्न झाले. तेव्हा वर, रिओ, एक वर्षाचा होता आणि वधू, रिया, फक्त नऊ महिन्यांची होती.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)