Dog Attack in Ahmedabad: अहमदाबादमध्ये 3 महिन्यांच्या बाळावर कुत्र्यांचा हल्ला; पाळण्यातून ओढून नेऊन घेतला चावा; घटना CCTV मध्ये कैद
मुलाचे आई-वडील जवळच काम करत होते. आवाज ऐकून पालक व इतर लोक तेथे पोहोचले असता एक कुत्रा मुलाला तोंडात धरून पळत आला.
Dog Attack in Ahmedabad: भटक्या कुत्र्यांच्या दहशतीचा एक हृदयद्रावक व्हिडिओ अहमदाबादमधून समोर आला आहे. येथे कुत्र्यांच्या टोळक्याने झुल्यात झोपलेल्या तीन महिन्यांच्या बाळाला ओढून नेले आणि त्याच्यावर हल्ला केला. मुलाचे आई-वडील जवळच काम करत होते. आवाज ऐकून पालक व इतर लोक तेथे पोहोचले असता एक कुत्रा मुलाला तोंडात धरून पळत आला. हे पाहून स्थानिक लोकांनी त्याचा पाठलाग सुरू केला. लोकांनी कुत्र्याच्या तावडीतून बाळाची सुटका केली. मुलाला गंभीर दुखापत झाली असून, त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. ही घटना गुरुवारी सकाळी घडली, ज्याचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले आहेत. (हेही वाचा - Pitbull Dog माणसाच्या प्रायव्हेट पार्टला चावला, रागाच्या भरात लोकांची त्याला बेदम मारहाण)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)