Bihar: आईची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुलीने हॉस्पिटलमध्येचं केले लग्न; काही तासांत गेला जीव, Watch Video
जिथे आईची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी, रुग्णालयातचं लग्न केलं. तिने आयसीयूमध्ये आपल्या आयुष्याच्या जोडीदाराबरोबर लग्नगाठ बांधली.
Bihar: बिहारच्या गया येथील एका सरकारी रुग्णालयात एक अनोखं लग्न पाहायला मिळालं. जिथे आईची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी, रुग्णालयातचं लग्न केलं. तिने आयसीयूमध्ये आपल्या आयुष्याच्या जोडीदाराबरोबर लग्नगाठ बांधली. आता या लग्नाची संपूर्ण परिसरात चर्चा होत आहे. वास्तविक, हे प्रकरण गयाच्या मॅजिस्ट्रेट कॉलनीतील एका खाजगी रुग्णालयाशी संबंधित आहे. जिथे गुररू ब्लॉकच्या बाली गावातील रहिवासी लालन कुमार यांची पत्नी पूनम कुमारी वर्मा यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांची प्रकृती चिंताजनक होती. डॉक्टरांनी कुटुंबीयांना कोणत्याही प्रसंगासाठी तयार राहण्याचा सल्ला दिला होता. आईची शेवटीची इच्छा पूर्ण केल्यानंतर अवघ्या काही मिनिटातचं या माऊलीने जीव सोडला.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)