Camel Ziplining Video: उंटाच्या झीपलाईन व्हिडिओ ची सोशल मीडीयात चर्चा
इथे पर्यटकांची मोठी गर्दी असते.
दुबई मध्ये सर्वात मोठ्या झीपलाईन वर उंटाने झीपलाईनचा अनुभव घेतल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये उंटानेही गॉगल लावत झीपलाईन अनुभवल्याचं दिसत आहे. दुबई मध्ये Ras Al Khaimah हा सर्वात मोठा झीपलाईन प्रोजेक्ट आहे. इथे चक्क उंटाला हारनेस लावून झीपलाईनचा अनुभव दिल्याचा व्हिडिओ झपाट्याने सोशल मीडीयात वायरल होत आहे. युजर्स देखील हा व्हीडिओ पाहून आश्चर्यचकित झाले आहे. पण हा वायरल व्हिडिओ दुबईतील प्रतिष्ठित raynatours ने हा व्हीडिओ शेअर करताना हा खरा उंट नसल्याचं शेअर केले आहे. उंटाची प्रतिमा ही कम्प्युटर जनरेटेड आहे. AI Technology वापरून हा व्हिडिओ बनवण्यात आला आहे.
उंटाचं झिपलाईनिंग
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)