Video: पुणे सोलापूर महामार्गावर टायर फुटल्याने बसला लागली आग, व्हिडिओ व्हायरल
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळी एका खासगी बसला भीषण आग लागली. या बसमध्ये 17 प्रवासी होते, सर्व प्रवासी वेळेत बाहेर पडल्याने त्यांचे प्राण वाचले. टायर फुटल्याने बसला आग लागली.
Video: पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळी एका खासगी बसला भीषण आग लागली. या बसमध्ये 17 प्रवासी होते, सर्व प्रवासी वेळेत बाहेर पडल्याने त्यांचे प्राण वाचले. टायर फुटल्याने बसला आग लागली.बस हैदराबादहून पुण्याला जात होती. मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर महामार्गावरील कदमवाकबस्ती गावाजवळील एका हॉटेलसमोर बसला आग लागली. आग लागल्यानंतर बसमधील प्रवासी घाबरले, आग लागल्याचे समजताच चालकाने सर्व प्रवाशांना बसमधून खाली उतरण्यास सांगितले. सर्व प्रवासी बसमधून बाहेर पडताच बस जळून खाक झाली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले.हेही वाचा:Pune Bus Fire Video: पुण्यात लक्झरी बसला आग, घटनेचा व्हिडिओ व्हायरल
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Sharad Pawar Criticizes Sanjay Raut: 'ऑपरेशन सिंदूर'; संजय राऊत यांच्या विधानावर शरद पवार यांना टोला, म्हणाले 'देशाच्या मुद्द्यावर स्थानिक राजकारण नको'
UAE vs Bangladesh, 2nd T20I Match 2025 Pitch Report: शारजाहमध्ये फलंदाज की गोलंदाज गाजवतील वर्चस्व; सामन्यापूर्वी खेळपट्टीचा अहवाल जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement