Bihar: नववधूला खांद्यावर उचलून वराने पार केली नदी, पाहा व्हायरल होत असलेला व्हिडिओ

बिहार येथील किशनगंजमधील कणकई नदीच्या पलसा घाटातील हा व्हिडिओ आहे. ज्यामध्ये एका वराने आपल्या नववधूला खांद्यावर घेतलेले दिसत आहे.

Bihar Groom ( Image Credit: YouTube)

एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक वर आपल्या नववधूला खांद्यावर घेऊन नदी ओलांडताना दिसत आहे.बिहार येथील किशनगंजमधील कणकई नदीच्या पलसा घाटातील हा व्हिडिओ आहे. शनिवारी लोहागड गावातून वर शिवकुमार सिंग यांची वरात पलसा गावी गेली होती. रविवारी परत येत असताना अर्धी नदी बोटीने ओलांडली पण त्यानंतर बोट अजून पुढे जाऊ शकली नाही. मग वराने आपल्या नव वधूला त्याच्या खांद्यावर उचलले आणि उरलेली नदी पार केली.

तेथे उपस्थित असलेल्या लोकांनी हा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर अपलोड केला. हा व्हिडिओ व्हायरल होताच आता परिसरातील चर्चेचा विषय बनला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now