Bhagalpur Train Mobile Snatching: चालत्या ट्रेनमधून मोबाईल फोन चोरणे पडले महागात; प्रवाशांनी चोराला खिडकीला लटकावून केली मारहाण (Video)

एका चोराने चालत्या ट्रेनच्या खिडकीतून प्रवाशाचा मोबाइल फोन हिसकावण्याचा प्रयत्न केला, पण तो यशस्वी होऊ शकला नाही. त्याऐवजी, प्रवाशांनी त्याला पकडले आणि चालत्या ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकवले.

Bhagalpur Train Mobile Snatching: चालत्या ट्रेनमधून मोबाईल फोन चोरणे पडले महागात; प्रवाशांनी चोराला खिडकीला लटकावून केली मारहाण (Video)
Bhagalpur Train Mobile Snatching

बिहारमधील भागलपूर रेलवे स्टेशनजवळ एक धक्कादायक घटना घडली. या ठिकाणी एका चोराने चालत्या ट्रेनच्या खिडकीतून प्रवाशाचा मोबाइल फोन हिसकावण्याचा प्रयत्न केला, पण तो यशस्वी होऊ शकला नाही. त्याऐवजी, प्रवाशांनी त्याला पकडले आणि चालत्या ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकवले. हा चोर सुमारे एक किलोमीटरपर्यंत ट्रेनसोबत खिडकीबाहेर लटकत राहिला. या दरम्यान प्रवाशांनी त्याला मारहाणही केली. शेवटी, एका व्यक्तीने त्याला वाचवले. सध्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. ही घटना मंगळवारी किंवा बुधवारी घडली असावी, असे सोशल मीडियावरील माहितीवरून दिसते. चोराने खिडकीतून हात घालून फोन हिसकावण्याचा प्रयत्न केला, पण प्रवासी सतर्क होते. त्यांनी तात्काळ त्याचा हात पकडला आणि त्याला खिडकीला लटकावले. चालत्या ट्रेनमध्ये तो लटकत असताना, काही प्रवाशांनी याचा व्हिडीओ बनवला. हा व्हिडिओ पाहिल्यास, चोराला आपली चूक चांगलीच महागात पडल्याचे दिसते. बिहारमधील रेल्वे मार्गांवर अनेकदा चोरी आणि दरोड्याच्या घटना घडतात, आणि त्यामुळे प्रवासी सतर्क राहतात. (हेही वाचा: Thief Caught Hiding In Gutter: लातूरमध्ये पोलिसांना चकवा देण्यासाठी चोर नाल्यात लपला! अटक करण्यापूर्वी पोलिसांनी आरोपीला कार वॉशिंग सेंटरमध्ये घातली अंघोळ)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Advertisement


Advertisement
Advertisement
Share Us
Advertisement