Bengaluru Bull Attack Video: बैलाच्या हल्ल्यात दुचाकीस्वार मरतामरता वाचला; बंगळुरूमधील घटनेचा व्हिडीओ व्हायरल (Watch Video)

बेंगळुरूमध्ये एका दुचाकीस्वाराचा बैलाच्या धडकते थोडत्यात जीव बचावला. थरारक दृष्यांचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

photo credit- x

Bengaluru Bull Attack Video: बंगळुरूमध्ये बैलाने केलेल्या हल्ल्यात (Bull Attack) एका दुचाकीस्वाराचा थोडक्यात जीव वाचला आहे. महालक्ष्मी लेआऊट परिसरात ही घटना घडली. ज्यात दुचाकीने जात असताना समोर आलेल्या बैलाने दुचाकीस्वारावर अचानक हल्ला केला. या घटनेत दुचाकीस्वार जमिनीवर पडला. त्यावेळी दुसऱ्या बाजूने ट्रक येता होता. सुदैवाने ही घटना ट्रक ड्रायव्हरच्या तात्काळ लक्षात आली. त्याने ब्रेक लावला. ज्यात दुचाकीस्वार ट्रकच्या खाली जाताजाता वाचला. ट्रक चालकाच्या तत्परतेमुळे दुचाकीस्वाराचे प्राण वाचले. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. (हेही वाचा :Viral Video: हातात लटकलेले डझनभर साप विकताना दिसला व्यक्ती, व्हिडीओ पाहून बसेल धक्का )

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement