Atlas Air Airliner Catches Fire: अॅटलस एअरलाइन च्या विमानाला आग; मियामी विमानतळावर करण्यात आले इमर्जन्सी लँडिंग, Watch Video
व्हिडिओमध्ये विमानामधून ठिणग्या आणि ज्वाला बाहेर पडताना दिसत आहेत.
Atlas Air Airliner Catches Fire: सध्या सोशल मीडियावर आकाशात उड्डाण भरलेल्या विमानाला आग लागल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. प्राप्त माहितीनुसार, अॅटलस एअरलाइन (Atlas Airliner) च्या विमानाला उड्डाण भरल्यानंतर आग (Fire) लागली. गुरुवारी रात्री, फुटेजमध्ये एटलस एअर फ्लाइट 95, बोईंग 747-8 विमानाला उड्डाण भरल्यानंतर रात्री 10:46 च्या सुमारास आग लागली. व्हिडिओमध्ये विमानामधून ठिणग्या आणि ज्वाला बाहेर पडताना दिसत आहेत. यानंतर विमान लगेच परत फिरून मियामी आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Miami airport) उतरवण्यात आले. हे विमान सॅन जुआन, पोर्तो रिकोला जात होते. विमानातील प्रवाशांना कोणतीही दुखापत झाल्याचे वृत्त नाही.
पहा व्हिडिओ -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)