Viral Video: मगरीने जबड्यात धरले पण वृद्धाने तारले, पाहा कुत्र्यासोबत नेमके काय घडले?

या मगरीच्या जबड्यात कुत्रा अडकलेला आहे. ही व्यक्ती कुत्र्याला मगरीच्या जबड्यापासून वाचवण्याचा प्रयत्न करत आहे.

Dog Caught in the jaws of a Crocodile (PC - X/@cctvidiots)

Viral Video: या जगात असे अनेक प्राणी आहेत जे मृत्यूच्या जवळून सुखरूप परत आले आहेत. अशा प्राण्यांबद्दल अनेकदा असे म्हटले जाते की, त्यांनी मृत्यूला पराभूत केले. अनेकवेळा माणसांसोबतच प्राणीही अशा प्रसंगांना बळी पडतात, पण नशिबाने साथ दिली की, यमराजालाही रिकाम्या हाताने परतावे लागते. सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक कुत्रा (Dog) मगरीच्या (Crocodile) जबड्यात अडकतो. यावेळी एक वृद्ध माणूस त्याच्यासाठी देव बनून येतो आणि त्याचा जीव वाचवतो.

हा व्हिडिओ X वर @cctvidiots नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे, ज्याला आतापर्यंत 4.7 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. यावर लोकांनी प्रतिक्रियाही दिल्या आहेत. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, एक वृद्ध व्यक्ती तलावात उभा असल्याचे दिसत आहे, तलावाच्या पाण्यातून डोके बाहेर काढताच त्याच्या हातात एक मगर दिसत आहे. या मगरीच्या जबड्यात कुत्रा अडकलेला आहे. ही व्यक्ती कुत्र्याला मगरीच्या जबड्यापासून वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान त्याच्या तोंडात एक सिगार दिसत आहे. काही प्रयत्नांनंतर, वृद्ध व्यक्ती कुत्र्याला मगरीच्या तावडीतून सोडवण्यात यशस्वी होतो. (Viral Video: तरुणीचा भरधाव ट्रेनमधून उडी मारताचा स्टंट व्हिडिओ व्हायरल)

पहा व्हिडिओ - 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)