Anant Ambani-Radhika Merchant Wedding: अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नसोहळ्यात संपूर्ण अंबानी कुटुंबाने कॅमेऱ्यांसाठी दिली खास पोज (Watch Video)

संपूर्ण अंबानी कुटुंबाने मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये कॅमेऱ्यांसाठी एकत्र पोज दिली. याचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

Anant Ambani-Radhika Merchant Wedding: अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नसोहळ्यात संपूर्ण अंबानी कुटुंबाने कॅमेऱ्यांसाठी दिली खास पोज (Watch Video)
Photo Credit: X

Anant Ambani-Radhika Merchant Wedding: अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नाचा भव्यदिव्य सोहळा मुंबईमध्ये पार पडत आहे. या लग्नाला देश-विदेशातील अनेक महत्वाच्या लोकांनी हजेरी लावली आहे. अशात संपूर्ण अंबानी कुटुंबाने मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये कॅमेऱ्यांसाठी एकत्र पोज दिली. याचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये मुकेश अंबानी, नीता अंबानी, त्यांचा मुलगा आणि वर अनंत अंबानी, आकाश अंबानी, त्याची पत्नी श्लोका मेहता आणि त्यांची मुले पृथ्वी आणि वेद, तसेच ईशा अंबानी आणि तिचा पती आनंद पिरामल दिसत आहेत. हेही वाचा:  Anant Ambani and Radhika Merchant Wedding LIVE Streaming Online: आज मुंबईमध्ये पार पडणार अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा भव्यदिव्य विवाहसोहळा; 'या' ठिकाणी पाहू शकाल या लग्नाचे थेट प्रक्षेपण (Video)

व्हिडिओ पहा- 

 

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jul 12, 2024 08:38 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).