सोशल मीडियाच्या दुनियेमध्ये अनेकदा लग्न समारंभांशी संबंधित व्हिडिओ व्हायरल होतात. कधी त्याचा एखादा गोंडस क्षण व्हायरल होतो, तर कधी तो त्याच्या धमाल नृत्याने इंटरनेटवर अधिराज्य गाजवतो. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये वरमाला सोहळ्यानंतर नववधू जोरात नाचताना दिसत आहे. त्याच वेळी, वर स्टेजवर तिच्याकडे पाहून हसत उभा आहे. व्हायरल झालेला हा व्हिडीओ वरमाला नंतर शूट करण्यात आल्याचे दिसते. आपण पाहू शकता की वधू आणि वर दोघांनीही हार घातले आहेत. या दरम्यान, वधू आपला आनंद रोखू शकत नाही आणि लगेचच वरमाला नंतर, ती जोरदार नाचू लागते. व्हायरल क्लिपमध्ये वधूचा चेहरा पाहण्यासारखा आहे.
View this post on Instagram
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)