Viral Video: गरोदर महिलेला ब्लँकेटच्या झोळीतून रुग्णालयात दाखल करण्याची वेळ, सोशल मिडीयावर व्हिडीओ व्हायरल
गर्भवती महिलेला खडतर मार्गातून ब्लँकेटच्या झोळीतून नेतानाचा प्रवास सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल होत आहे.
राज्यातील विविध भागात पाऊस मुसळधार पाऊस कोसळत आहे. गेल्या काही दिवसात उत्तर महाराष्ट्रात देखील पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. विविध भागात पूरसदृश्य (Flood) परिस्थिती निर्माण झाली असुन विविध गावांना पुराच्या पाण्याने विळखा घातला आहे तर कच्चे रस्ते वाहून गेल्याने अनेक गावांचा एकमेकांशी संपर्क तुटला आहे. नाशिक (Nashik) जिल्ह्यातील अशात एका गावखेड्यातला व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. या गावखेड्यात आवश्यक त्या वैद्यकीय सोयी उपलब्ध नसल्याने एका गर्भवती महिलेला ब्लँकेटच्या झोळीतून शहरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. गर्भवती महिलेला खडतर मार्गातून ब्लँकेटच्या झोळीतून नेतानाचा प्रवास सोशल मिडीयावर (Social Media) जोरदार व्हायरल होत आहे. तरी प्रशासनाकडून वेळीच दखल घेण्यात यावी अशी मागणी नेटकऱ्यांकडून होत आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)