Accident Caught on Camera in Ghaziabad: गाझियाबादमध्ये कचरा भरणाऱ्या ट्रकच्या धडकेत 2 वर्षीय मुलगी गंभीर जखमी; पहा व्हिडिओ
हा संपूर्ण अपघात तेथील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. फुटेजमध्ये एलिना तिच्या बहिणीसोबत उभी असल्याचे दिसत आहे. एलिनाच्या दिशेने ट्रक हळूहळू जवळ येत आहे. ट्रकचा वेग कमी असूनही, चालकाचे त्या मुलाकडे लक्ष गेले नाही.
Accident Caught on Camera in Ghaziabad: रविवारी गाझियाबाद (Ghaziabad) महानगरपालिकेच्या (GNN) कचऱ्याच्या ट्रकने एलिना नावात्या 2 वर्षांच्या मुलीला चिरडलं. या मुलगी गंभीर जखमी झाली. इस्लाम नगर, कैला भट्टा वॉर्ड क्रमांक 93 मधील एका अरुंद गल्लीत दुपारी 12 च्या सुमारास ही घटना घडली. हा संपूर्ण अपघात तेथील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. फुटेजमध्ये एलिना तिच्या बहिणीसोबत उभी असल्याचे दिसत आहे. एलिनाच्या दिशेने ट्रक हळूहळू जवळ येत आहे. ट्रकचा वेग कमी असूनही, चालकाचे त्या मुलाकडे लक्ष गेले नाही.
दरम्यान, चालक तिला गंभीर अवस्थेत सोडून घटनास्थळावरून पळून गेला. या मुलीला वाचवण्यासाठी एका बाजूच्या व्यक्तीने धाव घेतली. एलिनाला तातडीने संतोष रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेने सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे, परंतु अद्यापपर्यंत पोलिसांनी चालकावर कारवाई केल्याचे वृत्त नाही.
गाझियाबादमधील अपघाताचा व्हिडिओ -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)