Worli Hit-and-Run Case: वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी Mihir Shah ला 16 जुलैपर्यंत पोलीस कोठडी; वडील Rajesh Shah यांची शिवसेना उपनेतेपदावरून हकालपट्टी
त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी 14 पथके तयार केली होती. मंगळवारी त्याला अटक केली गेली.
Worli Hit-and-Run Case: मुंबईमधील वरळी हिट अँड-रन प्रकरण सध्या चर्चेत आहे. विरोधी पक्षांनी हे प्रकरण चांगलेच उचलून धरले आहे. आता मुंबई बीएमडब्ल्यू हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शहा याला 16 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. एका महिलेचा बळी घेणाऱ्या हिट अँड रन घटनेत मिहीर शाह तीन दिवसांपासून बेपत्ता होता. मंगळवारी, 9 जुलै रोजी त्याला अटक करण्यात आली. दुसरीकडे, मिहीरचे वडील राजेश शहा यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षाच्या उपनेतेपदावरून हटवण्यात आले आहे. पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शहा यांना त्यांच्या पदावरून हटवण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. याबाबत पक्षाने एक परिपत्रक जारी केले आहे.
हा हिट अँड रन प्रकरणानंतर मिहीर शाह फरार होता. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी 14 पथके तयार केली होती. मंगळवारी त्याला अटक केली गेली. वरळीतील डॉ. ॲनी बेझंट रोडवर मिहीरने चालवलेल्या बीएमडब्ल्यू कारने स्कूटरला धडक दिली होती व या अपघातामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला होता. याबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात, ‘हिट अँड रन प्रकरणात जो कोणी दोषी असेल त्याला सोडले जाणार नाही, अशा सूचना मी दिल्या आहेत. याबाबत कठोर कारवाई केली जाईल.’ (हेही वाचा: CM Eknath Shinde यांनी विक्रोळी भागात रिक्षा अपघातानंतर किरकोळ जखमी महिलेच्या मदतीसाठी ताफा थांबवत केली मदत)
पहा पोस्ट-