Women Commission Letter To Mumbai Police: किरीट सोमय्या यांच्या व्हिडिओची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यासाठी महिला आयोगाचे मुंबई पोलिसांना पत्र
व्हायरल झालेल्या व्हिडिओनंतर अनेक सामाजिक संघटनांनी महिला आयोगाकडे हस्तक्षेपाची मागणी केली.
Women Commission Letter To Mumbai Police: महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने 18 जुलै रोजी मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांना पत्र पाठवून भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचा समावेश असलेल्या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. महिला आयोगाने पोलिसांना चौकशी प्रक्रिया तपास जलद गतीने करून तथ्य शोध अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडिओनंतर अनेक सामाजिक संघटनांनी महिला आयोगाकडे हस्तक्षेपाची मागणी केली. याला उत्तर देताना, महिला आयोगाने तातडीने मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहून, जलद आणि व्यापक तपास करण्याचे आवाहन केले. (हेही वाचा - Kirit Somaiya: किरीट सोमय्या यांचा कथित व्हिडिओ व्हायरल; विरोधी पक्ष नेत्यांची चौकशीची मागणी)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)